शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

शाळॆचा शैक्षणिक प्रवास

   **************** शाळॆचा शैक्षणिक प्रवास *****************

________________________________________________________

          शाळेत आजमितीला १४ मुले आणि २५ मुली असे एकूण ३९ विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत एकही विद्यार्थी अप्रगत नाही. जुलै २०१६ रोजी झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये तसेच १९ व २० ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या संकलित मूल्यमापन परिक्षेत शाळेतील प्रत्येक वर्गाची तसेच शाळेला 'अ ' श्रेणी प्राप्त झाली आहे.  अप्रगतविरहित शाळा म्हणून  परिसरात ओळख आहे. 

        प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत स्वयंमूल्यमापनमध्ये शाळेला 'ब ' दर्जा प्राप्त झालेला असून डिजीटल शाळा तयार करण्याचा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांचा मानस आहे. त्या दिशेने विद्यार्थी व  शिक्षकांची वाटचाल सुरु आहे.

        शाळेमध्ये भाषा, गणित या विषयांच्या तयारीबरोबरच इंग्रजी विषयाच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. विद्यार्थी मराठी इतक्याच आवडीने इंग्रजी विषयाचा अभ्यास करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा