बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

आम्ही लेखन करतो

                            आम्ही लेखन करतो

        पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त विद्यार्थी उर्वरित वेळेत अवांतर वाचन करतात. यामुळे मुलांच्या लेखनात खूप सुधारणा झाली आहे. दिलेल्या कोणत्याही विषयावर मुले आपली मते आपल्या शब्दात मांडतात.

             मुलांच्या विचार प्रतिमा ........

 
          आज सकाळी उठून बाहेर गेले.कोणीतरी मला हाक मारली. इकडे तिकडे पाहिले तार पाऊसच माझ्याशी बोलत होता.
                         आर्या उत्तम बोडके -तिसरी 
प्रेम: आई आपल्यावर खूप प्रेम करते. आपले काही दुखले कि ती आपली काळजी घेते, यालाच म्हणतात प्रेम.
राग: आमचे सगळ्यांचे पेपर चुकले होते तेव्हा मला खूप राग आला होता आणि मला कुणी काही म्हणले की, मला खूप खूप राग येतो.
                     पायल राणोजी कांबळे -चौथी                                       
मॅडम आणि कार्तिक यांनी सामोसे व शेव जेव्हा माझ्या ताटात वाढले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. ते ही खूपच. मी कधी हे पदार्थ खाते असं मला झालं होतं. मी व माझ्या शाळेतले आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असे अध्यक्ष लाभले.
                                                           नेहा भीमराव भारशंकर -चौथी 
 
बालमित्रांनो, ओळखलं का मला? तेच मी जे फुलांवर बागडणारं. एक छोटसं फुलपाखरू, तुम्ही मुलं माझे पाय तोडता पंख फाडता, मला किती दुखापत होते. हा! हा! म्हणता. खूप हसता. आम्हाला लागल्यावर ओरडता सुद्धा येत नाही. तुम्हाला जसे दोन हात, दोन पाय, एक नाक, एक तोंड जे नाही ते आहे तुम्हाला. आम्ही फक्त पायानी चव घेतो. आम्ही फुलांवरचा मध पिऊन राहतो. तुमचे काय? आयत्या बिळात नागोबा असे आहे. आम्ही आमचं कष्ट करून कसतरी जीवन जगतो. तेही तुम्ही मुलं नष्ट करता. आमचं जीवन किती? तर दोन-तीन महिने. तुमचं किती छान व किती मोठं जीवन आहे. आमच्या जीवनात तीन पान असतात. पहिले पान जीवन व शेवटचे पान मृत्यू. मधले पान,जे जीवन आहे ते सुखाने जगावे. आपण जे जे करतो ते ते देव मधल्या पानावर लिहितो. तुम्ही कसं वागता तेच आम्हाला कळत नाही. बाय.. 
    माझे मित्र निघाले, जीवाभावाचे, तसे तुम्ही नाही. निघलो आता.

                                                          अंजली परसू चव्हाण- चौथी 


सुगरणीचा खोपा ही कविता म्हणताना मला सारखं वाटत राहतं, माझं असचं छोटसं जीवन असावं, आणि ते मी आनंदाने जगावं.

                                                    वैष्णवी दत्तात्रय खामकर - तिसरी

आम्ही सर्वजण आता ऑनलाईन व्हिडीओ पाहायला शिकत आहोत.मला जर लॅपटॉप वापरायला मिळाला तर सर्वप्रथम मी छानसा व्हिडीओ पाहणार व मॅडमला दाखवणार.

                                                                                                        दिशा दिलीप कुंजीर - तिसरी.


                 तुळस
दारात आहे तुळस,
तिला पाहून जातो सगळा आळस.
दिवा लावला पूजा केली,
तुळशीसमोर रांगोळी काढली.
तुळशीत लावला दिवा,
तुळशीमाई तुझा आशीर्वाद हवा.