गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

शिक्षणाची वारी

शिक्षणाची वारी 

            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचे नियोजन पुण्यातील बालेवाडी येथील  शिछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी दिनांक  २८,२९ व ३० नोव्हेंबर या  कालावधीत  करण्यात आले होते. शैक्षणिक वारीचे हे दुसरे वर्ष होते.
              या शैक्षणिक वारीमध्ये महाराष्ट्र राज्यातून आलेले अनेक उपक्रमशील शिक्षक आपापले  नवनवीन शैक्षणिक प्रयोग व साहित्य  घेऊन आले होते.
              पंढरीच्या  वारीमध्ये वारकर्यांबरोबर  मुलांना घेऊन सामील होणारी आमची शाळा, आमचे व्यवस्थापन सदस्य , पालक या शैक्षणिक  वारीतही आनंदाने सहभागी झाले.  दिवसभर या वारीतील सर्व  ‌स्टॉलसना भेट देऊन सर्व  उपक्रमांची पाहणी केली. 
           शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. या नवीन वर्गखोल्यांसाठी  कोणत्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. 
          हवेली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मान. सौ. ज्योती परिहार यांनी  या उपक्रमाचे विशेष कौतूक केले. या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमच्या सोबत आमच्या मार्गदर्शक केंद्रप्रमुख सौ. शितोळे स्नेहलता या होत्या. त्याचबरोबर  अध्यक्ष श्री. सुशांत काळे, श्री.सुरेश काळे, सदस्य सौ. सीमा बोडके, सौ. मनिषा बोडके , सौ. सीमा कुंजीर या सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.
                                    छायाचित्रे