सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

परदेशी पाहुण्यांची शाळेला भेट

परदेशी पाहुण्यांची शाळेला भेट 

               विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अनुभव मिळावेत म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवासाठी मलेशिया येथून थेऊर येथे आलेल्या सरोज सेठ व संगिता मॅडम या परदेशी पाहुण्यांनी शाळेला भेट दिली. 

            विद्यार्थ्यांशी त्यांनी हिंदी आणि इंग्रजीतून संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे त्यांनी तोंड भरून कौतूक केले. शाळेने आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी भारतीय पद्धतीने केलेल्या पाहुणचाराने पाहूणे भारावून गेले.












       

गणेशोत्सव

गणेशोत्सव 

              पुणे शहर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर. पुण्यातील गणेशोत्सव पारंपारिक आणि आधुनिकतेचा मेळ  घालणारा. गणेशोत्सव हा पारंपारिक असला तरी याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अनेक भव्य व आकर्षक देखावे तयार करणे हेच पुण्याच्या गणपती उत्सवाचे वैशिष्ट्य. 

            शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, माता पालक, सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक मिळून गणेशोत्सवातील देखावे पाहायला जातात. सर्व पालकांच्या व शिक्षकांच्या एकजुटीचा  व वैचारिक समन्वयाचा सुंदर मेळ या कार्यक्रमात दिसून येतो.