रविवार, २५ डिसेंबर, २०१६

एक नवी कल्पना -- शाळा भरली दप्तराविना ( कार्यक्रम २ )

एक नवीन कल्पना ---- शाळा भरली दप्तराविना ( कार्यक्रम २)

                 हवेली तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी मान. ज्योती परिहार यांनी हवेलीसाठी दप्तराविना शाळा --दर शनिवारी हा एक उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देणारा आहे, पण त्याचबरोबर या उपक्रमामुळे शिक्षकांच्या कल्पकतेला वाव मिळत असून अनेक अभिनव व अनोखे उपक्रम दर शनिवारी हवेलीतील शाळांमध्ये राबविले जात आहेत. 

                आम्हीदेखील प्रत्येक अठवड्यासाठी काय वेगवेगळे उपक्रम ठेवता येतील याचा विचार करत असतो. शनिवार दिनांक १०/१२/२०१६ या दिवशी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , तारामळा  दप्तराविना भरली.

              आमचा हा दिवस अगदी रंगीबेरंगी होता कारण  या दिवशी आमच्या शाळेतील मुलांना आम्ही विविध वेशभूषा करून शाळेत बोलावले होते. अट फक्त एकच होती, कोणताही खर्च न करता परिसरात मिळणाऱ्या वस्तू आणि साहित्य वापरून मुलांनी स्वतःला एका वेगळ्या रुपात तयार करणे.

             मुलांचे परस्पर सहकार्य, पालकांची आवड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यातून तयार झालेले आमचे विद्यार्थी पहा.............



              यांना पाहून नववधू प्रिया मी बावरते  या ओळींची आठवण  झाल्याशिवाय राहत नाही.

               फक्त एका क्षणापुरते डोळे मिटा . श्रीकृष्ण याच लोभस रुपात आपल्या नजरेसमोर येईल. अगदी निरागस .................

              यांच्याकडे पाहून राधा ही श्रीकृष्णाची सखी , मैत्रीण आहे हे वेगळं सांगावच लागत नाही.
                 जंगल बूकच्या मोगलीची आठवण झाली ना ?

              जंगल जंगल पता चला है , चड्डी पहनके फुल खिला है !



                 मी राजकन्या माझ्या आईची , माझ्या बाबांची असे तर म्हणत नसतील ना या छोट्या मैत्रिणी .......




                   मी छोटीशी भाजीवाली छान छान छान ..........

                            


                       परी  ग परी खेळायला ये ना माझ्या घरी 

                

                   रंगीबेरंगी  चेहऱ्याचा हसरा आणि हसवणारा विदुषक 




 
  कोळ्याच्या वेषातील आमची छोटी बच्चे कंपनी 
 गालावर खळी डोळ्यांत धुंदी 
 खादीचा पुरस्कार करणारे आमचे आण्णा 
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान 
एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
पांढऱ्या शुभ्र वेषातील फुलांनी सजलेली शकुंतला 
वनकन्या मी हसून पाहते 






छोट्या गोड गोंडस बाहुल्या 






                                  मी मग्न माझ्याच स्वप्नांत , माझ्याच धुंदीत

                      अशा प्रकारे दप्तराविना शाळेचा एक दिवस अतिशय रंगीबेरंगी व आनंददायी असा ठरला. रंगीबेरंगी पाखरांचा हा थवा पहा.....