बालदिन -- बाल आनंद मेळावा
आज दिनांक १४/११/२०१६ वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बालदिनानिमित्त शाळेत आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा निसर्ग रम्य अशा रामदरा देवालय लोणी काळभोर या ठिकाणी आयोजित केला होता. वनविहार, वनभोजन, विविध खेळ, गाणी, गोष्टी, झाडावर चढण्याचा आनंद असे वेगवेगळे आनंददायी उपक्रम या वेळी राबविले गेले.
माता पालक संघाने या कार्यक्रमात उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. मुलांना खाऊसाठी लाडू, गुलाबजाम, चकली, चिवडा असे पदार्थ देण्यात आले. इतर अनेक कार्यक्रमाप्रमाणेच बालदिनाचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी ठरला.
आमचा आंनद