गुरुवार, १८ मे, २०१७

गुढीपाडवा दिनांक २८/०३/२०१७

 गुढीपाडवा दिनांक २८/०३/२०१७   

                    दिनांक २८/०३/२०१७, वार मंगळवार गुढीपाडवा भारतीय सौर वर्षाची सुरुवात. हिंदू वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी तारमळा शाळेत गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. 
              शाळेच्या प्रत्येक उपक्रमात परंपरा जपतानाच परंपरेला आधुनिकतेची जोड देतो आपण. त्यामुळेच या गुढ्या उभारताना विद्यार्थी आपल्या कल्पना वापरतात आणि आपली स्वतःची गुढी ऊभी करतात. उदा. प्रेमाची गुढी, संकल्पाची गुढी वगैरे.
          या वर्षीच्या  गुढीपाडव्याचा दिवस  हा शाळेसाठी खरोखरीच सोनेरी किरणे घेऊन उगवला. कारण आजपासून शाळेत अक्षरभारती संस्थेमार्फत ज्युनिअर आर्यभट्ट बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग या प्रकल्पाची सुरुवात झाली. या निमित्ताने संस्थेने शाळेसाठी २० संगणक उपलब्ध करून दिले. पुढील चार महिने हा प्रकल्प शाळेत राबविला जाणार आहे.
           ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना संगणक हाताळायला मिळणे ही मुलांसाठी खरोखरीच एक सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने केल्याशिवाय आपण थांबायचे नाही असा दृढनिश्चय सर्वांनी केला.
         या कार्यक्रमाला थेऊरच्या केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व पालक, माता पालक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.