शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

अक्षरभारती लायब्ररी सेट अप

  अक्षरभारती  लायब्ररी सेट अप 
              शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अक्षरभारती संस्था, पुणे महाराष्ट्रभर वाचन चळवळ राबवित आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारमळा येथे दिनांक १२ मार्च २०१६ रोजी अक्षरभारती वाचनालाय सुरु करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाळेला सुमारे १०,००० रुपये किंमतीची २१० पुस्तके देण्यात आली आहेत. यामध्ये मराठी गोष्टी, गाणी,चरित्रात्मक पुस्तके तसेच इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. अक्षरभारती संस्थेसाठी काम करणारे श्री. निलेश शिंगे सर, संस्थेचे समन्वयक श्री. गणेश सर, श्री. संतोष सर शाळेला भेटी देऊन मुलांनी वाचलेल्या पुस्तकांबाबत मुलांशी चर्चा करत आहेत. विदयार्थ्यांच्या वाचन प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या लेखनाची प्रशंसा करत आहेत.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा