शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

आमच्या गावाविषयी थोडेसे

                      आमच्या गावाविषयी थोडेसे 

         विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर  मुळा मुठा नदीच्या काठावर थेऊर हे गाव वसलेले असून गावाला पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.
        अष्टविनायकांपैकी श्री. चिंतामणी गणपतीमुळे थेऊर गाव एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.  माधवराव पेशवे आणि सती रमाबाई पेशवे यांची समाधी थेऊरचे पावित्र्य वाढविण्यास मदत करतात. 
         यशवंत सहकारी साखर कारखान्यामुळे थेऊरचे नाव सहकार व  औदयोगिक क्षेत्रातही सर्वश्रुत आहे.
          गावची लॊकसंख्या सुमारे १७००० असून विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंद्याने एकत्र राहत आहेत.
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा