शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

गुरुपौर्णिमा

                      गुरुपौर्णिमा - थोडीशी वेगळी 

              भारतीय संस्कृतीमध्ये ,जीवनशैलीमध्ये पुराणांमध्ये गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  जीवनाला आकार देणारा गुरु.  गुरुविषयी आदरभाव दाखवत त्यांचे पूजन करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस.  ही गुरुपौर्णिमा सर्वच शाळांमध्ये साजरी केली जाते.  तारमळा शाळा आपले वेगळेपण जपत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करते. आई -वडील आपले जीवनातले सर्वांत  मोठे आणि सर्वात पहिले गुरु असतात  म्हणून या दिवशी मातृ-पितृ पूजनाचे नियोजन शाळेत केले जाते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक या दिवशी शाळेत या  कार्यक्रमासाठी उपस्थित  राहतात.

              मुले आपल्या पालकांचे विधिवत पूजन करतात.  पालकांसाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रम म्हणजे एक आनंदपर्वणी आहे. 

                       















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा