शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

अभ्यास दौऱ्यांचे नियोजन

                   अभ्यास  दौऱ्यांचे नियोजन 

         ज्ञानरचनावाद आणि आदर्श शाळा यांचा अभ्यास करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्य- -भरातील शिक्षकांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. परंतू शाळा भौतिक, बौद्धिक अशा सर्व अंगानी विकसित करावयाची असेल तर अशा प्रगत शाळांपर्यंत पालकही पोचायला हवेत, या विचारातून शाळा व्यव- 
-स्थापन समिती सदस्य व पालकांचा अभ्यास दौरा शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला. अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलींमुळे  शिक्षक आणि पालक यांच्यातील व्यावसायिक नाते संपुष्टात येऊन जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होत आहेत.  याचा सकारात्मक परिणाम शालेय कामकाजावर होत आहे. बाहेरच्या शाळांमधील प्रशंसनीय बाबी पाहून  आपल्या शाळेत असे बदल घडवण्याची मानसिकता तयार होत असून याचा शाळेच्या प्रगतीवर परिणाम होऊन अपेक्षित बदल घडून येणार आहेत.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा