शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

२६ जानेवारी -- प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी -- प्रजासत्ताक दिन

                   २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन, सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा दिवस. सर्वच शाळांमध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारमळा येथे हा दिवस आनंदात साजरा करण्यात आला. 
                या प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व पालक, गावातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
               या वर्षीचा कार्यक्रम आमच्या शाळेसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. कारण शाळेत ई-लर्निंगचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व वर्गांचा अभ्यासक्रम असणारा ई -लर्निंगचा सेट शाळेला देणगीस्वरुपात प्राप्त झाला.
                सप्टेंबर महिन्यात मलेशिया येथील सरोज व संगिता  मॅडम यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली होती. शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती ई -मेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना दिली जात होती. प्रसार माध्यमाचा एक अतिशय चांगला फायदा शाळेला झाला. सुमारे ४५०००/- रुपये किमतीचा ई-लर्निंग सेट शाळेला मलेशियाच्या पाहुण्यांनी देणगीस्वरुपात दिला. सर्वात आश्चर्य आणि अभिमानाची बाब म्हणजे मुलांना सरप्राईज मिळावे आणि प्रजासत्ताक दिनी उद्घाटन व्हावे  या उद्देशाने २५/०१/२०१७ रोजी रात्री सर्वांनी मिळून शाळेत प्रोजेक्टरचे सेट अप केले. २६/०१/२०१७ रोजी सकाळी उत्साहात उद्घाटन झाले.
              शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि शिक्षक यांनी केल्या प्रयत्नांना मिळालेले हे फार मोठे यश आहे. नवीन इमारतीमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले यशस्वी पाउल ठरले. 
              मुलांसाठी ही एक आनंदपर्वणी ठरली. ग्रामस्थांनीही हा आनंद पेढे वाटून साजरा केला. 
                                           क्षणचित्रे






  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा