मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

एक नवीन कल्पना --- शाळा भरली दप्तराविना

एक नवीन कल्पना --- शाळा भरली दप्तराविना 

             हवेली पंचायत समितीच्या  गटशिक्षणाधिकारी  मान. ज्योती परिहार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून  हवेली प्राथमिक शिक्षण विभाग दप्तराविना  शाळा हा उपक्रम हवेलीतील शाळांमधून राबवित आहे.  

           या उपक्रमांतर्गत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , तारमळा येथे शनिवार दिनांक ०३/१२/२०१६ रोजी दप्तराविना शाळा घेण्यात आली. या दिवशी मुलांच्या  सायकल रॅलीचे नियोजन शाळेने केले होते. शाळेपासून ग्रामदैवत महातारी माता मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.

       या फेरीदरम्यान मुलांनी  निसर्ग उद्यानाला  भेट दिली. या कामासाठी वन अधिकारी  मगर मॅडम  यांनी मोलाचे सहकार्य  केले. मुलांना निसर्ग उद्यान पाहायला मिळाले. विविध वनस्पतींची ओळख झाली. या सफरीचा मनसोक्त आनंद मुलांनी लुटला.

                                           आनंदाचे क्षण 





















 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा