बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

राष्ट्र सेवा संघ --- हेमंत शिबिरातील सहभाग

राष्ट्र सेवा संघ --- हेमंत शिबिरातील सहभाग 

          राष्ट्र सेवा संघ ही एक देशव्यापी संघटना आहे. व्यक्तिमत्त्व विकास व संस्कारक्षम मुले घडविण्यासाठी  विविध ठिकाणी उन्हाळी, हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाते.
               संघटनेच्या हिवाळी शिबिराला हेमंत शिबीर असे संबोधले जाते. या वर्षीचे सोलापूर रोड परिसरातील मुलांसाठी हेमंत शिबिराचे आयोजन निसर्गरम्य अशा रामदरा शिवालय ,लोणी काळभोर या ठिकाणी दिनांक ०९/१२/२०१६ ते ११/१२/२०१६ या कालावधीत करण्यात आले होते. तीन दिवसांच्या या शिबिरासाठी ५० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले होते.
            पहाटे ०५ वाजेपासून  रात्री ११ वाजेपर्यंत दिवसभराचा अतिशय सुंदर व संस्कारक्षम असा या शिबिराचा कार्यक्रम होता.
            तारमळा  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांच्या विशेष प्रयत्नातून या शिबिरात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी  एक दिवसीय सहभाग घेतला. रविवार दिनांक ११/१२/२०१६ या दिवशी सर्व विद्यार्थी या शिबिरास उपस्थित राहिले. देशभक्तीपर कथा ,गीते, किल्ल्यांच्या माहितीचे वाचन अशा अनेक उपक्रमात मुलांनी भाग घेतला.
           स्वावलंबन या सदरामध्ये मुलांनी स्वतःचे जेवण वाढून घेणे. आपापली ताटे व वाट्या धुणे. जेवणानंतर स्वच्छता करणे इत्यादी छोट्या उपक्रमात सहभाग घेतला. 
           या शिबिरातील एक तासाचे मौन हा उपक्रम विशेष वाखाणण्यासारखा होता. एका भव्य प्रांगणात सुमारे ५५० विद्यार्थी  निःशब्दपणे वावरत होते. ही शांतता देखील मुलांना खूप काही शिकवून गेली, अगदी निःशब्दपणे.....................
           फोटो पाहून या कार्यक्रमाची भव्यता आपल्या लक्षात येईल.










 
          
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा