सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

दीपावली महोत्सव दिनांक २१/१०/२०१६ ते २५/१०/२०१६


             दीपावली महोत्सव ----- आपल्या शाळेचा 

               पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मान. ज्योती परिहार यांचेकडील दिपावली  महोत्सवाचे परिपत्रक मान. केंद्रप्रमुख सौ.शितोळे मॅडम यांचेमार्फत आमच्याकडे पोचले.

             या परिपत्रकातील सूचनांचा विचार करून शाळेने एक आगळावेगळा दीपावली महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले. नियोजन पुढीलप्रमाणे होते........

                       दिनांक                     उपक्रम 

                  २१/१०/२०१६      ---    भेटकार्ड तयार करणे.

                 २२/१०/२०१६      ---     रांगोळी काढणे.

                 २३/१०/२०१६      ---     आकाशदिवे तयार करणे.

                 २४/१०/२०१६     ---      पणत्या रंगविणे.

                  २५/१०/२०१६     ---      किल्ला तयार करणे.

                                 *दिपावली  महोत्सवाची छायाचित्रे *

















                                        

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

प्रवेशोत्सव

प्रवेशोत्सव

             दरवर्षी शाळा सुरु होताना १५ जून रोजी सर्व शासकीय शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातो. या दिवसासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात मुलांचे स्वागत करण्यासाठी परीराणी आली. परीने मुलांना फुगे आणि खाऊ वाटप करून मुलांचे स्वागत केले. त्यानंतर मुलांना पाठ्यपुस्तक वाटप व गणवेश वाटप करण्यात आले.

                   प्रवेशोत्सवाची  छायाचित्रे 





 


आमची रांगोळी

  आमची रांगोळी 

                            शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुणांची जोपासना व्हावी या दृष्टीने मुलांसाठी विविध कला स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, पाठांतर स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे नियोजन केले जाते. 

     ...........रांगोळी स्पर्धेत मुलींनी काढलेल्या काही रांगोळ्या..........















 

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

मैत्री वर्तमानपत्राशी

                       सकाळशी मैत्री ---- बालमित्र वाचन 

               बालमित्र, सकाळ वृत्तपत्र समुहाद्वारे दर शनिवारी मुलांसाठी प्रसिद्ध होणारा अंक. श्री. निलेश शिंगे सरांनी सकाळचे पुणे विभागाचे वितरण विभाग प्रमुख श्री. अब्दुल सरांशी संपर्क साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बालमित्रचे अंक मोफत देण्याची व्यवस्था केली. मागील सहा महिन्यांपासून हे अंक मुलांना मिळत असून अंक वाचल्याने मुलांचा साहित्यिक विकास होत आहे. चित्र रंगवा सारख्या उपक्रमांमुळे मुलांचा कलात्मक विकास होत आहे.





 

हनुमान जयंती उत्सव

                                    हनुमान जयंती उत्सव 

                   चैत्र पौर्णिमेला सकाळी शाळेत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थी वानरवेशात उपस्थित राहतात. हनुमान जयंतीसाठी जमलेली ही छोटी वानरसेना पाहिली की, पाहणाऱ्याचे भान हरपून जाते.
                      हनुमान जयंतीची छायाचित्रे