गुरुवार, १८ मे, २०१७

गुढीपाडवा दिनांक २८/०३/२०१७

 गुढीपाडवा दिनांक २८/०३/२०१७   

                    दिनांक २८/०३/२०१७, वार मंगळवार गुढीपाडवा भारतीय सौर वर्षाची सुरुवात. हिंदू वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी तारमळा शाळेत गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. 
              शाळेच्या प्रत्येक उपक्रमात परंपरा जपतानाच परंपरेला आधुनिकतेची जोड देतो आपण. त्यामुळेच या गुढ्या उभारताना विद्यार्थी आपल्या कल्पना वापरतात आणि आपली स्वतःची गुढी ऊभी करतात. उदा. प्रेमाची गुढी, संकल्पाची गुढी वगैरे.
          या वर्षीच्या  गुढीपाडव्याचा दिवस  हा शाळेसाठी खरोखरीच सोनेरी किरणे घेऊन उगवला. कारण आजपासून शाळेत अक्षरभारती संस्थेमार्फत ज्युनिअर आर्यभट्ट बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग या प्रकल्पाची सुरुवात झाली. या निमित्ताने संस्थेने शाळेसाठी २० संगणक उपलब्ध करून दिले. पुढील चार महिने हा प्रकल्प शाळेत राबविला जाणार आहे.
           ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना संगणक हाताळायला मिळणे ही मुलांसाठी खरोखरीच एक सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने केल्याशिवाय आपण थांबायचे नाही असा दृढनिश्चय सर्वांनी केला.
         या कार्यक्रमाला थेऊरच्या केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व पालक, माता पालक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.












     

सोमवार, १३ मार्च, २०१७

रंगांचा सण - होळी

होळी आणि धुलीवंदन  

                  ऑनलाइन परीक्षा देत डिजिटल शाळेची वाटचाल करत असताना परंपरा जपण्याचा प्रयत्न आमची शाळा करत असते. त्यामुळेच शाळेत सर्वच सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात.

             होळी -- वाईट प्रवृतींवर चांगल्या प्रवृतींच्या विजयाचा संदेश देणारा हा सण. वाईट गोष्टींना नष्ट करण्याचा मानस मनात ठेऊन आम्ही कचऱ्याची होळी करण्याचे नियोजन केले. या उपक्रमाची तयारी म्हणून सर्व मुलांनी परिसरातील कागद आणि कचरा गोळा केला. होळीच्या दिवशी संध्याकाळी या सर्व कचऱ्याची शाळेच्या आवारात होळी करण्यात आली. तत्पूर्वी शाळेतील शिक्षकांनी मुलांना होळी सणाविषयी गोष्ट सांगितली.

         होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा. या दिवशी मुलं शाळेत विविध रंग घेऊन हजर होती. अतिशय आनंदात आणि उत्साहात मुलांनी शाळेत रंगांची उधळण एकमेकांवर केली आणि सगळी शाळा काही क्षणात रंगीबेरंगी झाली.  रंगात माखलेली मुले  पाहून जणू काही बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत आहेत असा भास होत होता. 

                               पाहू या काही क्षणचित्रे  

















 

ऑनलाईन परीक्षा दिनांक १९/०२/२०१७

ऑनलाईन परीक्षा दिनांक १९/०२/२०१७  

                  सिंधुगुरू टीम ,सिंधुदुर्ग येथील शिक्षकांनी इयत्ता चौथी /पाचवी आणि सातवी /आठवी या दोन गटांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर एस.टी.एस. ऑनलाईन परीक्षेचे नियोजन केले होते.
                 महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातील बारा विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाली होते. आनंद आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे सर्व विद्यार्थी आपल्या तारमळा शाळेचे होते.
                या परिक्षेत सहभागी होण्यासाठी मुलांचे मेल आय डी तयार करणे आवश्यक होते. ते मुलांनी तयार केले. परिक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरले आणि दिनांक १९/०२/२०१७ रविवार रोजी सर्व बारा मुलांनी यशस्वीरित्या ही परीक्षा दिली.

                   

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

सुस्वागतम

                             सुस्वागतम 

 

ब्लॉगला भेट देणाऱ्या आमच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 




 स्वागतोत्सुक  :

  शिक्षण विभाग, पंचायत समिती, हवेली, जिल्हा : पुणे.
 
ग्रामपंचायत थेऊर, तालुका : हवेली, जिल्हा : पुणे.

केंद्रप्रमुख केंद्र : थेऊर , तालुका: हवेली, जिल्हा: पुणे.

शाळा व्यवस्थापन समिती, जि.प.प्राथमिक शाळा, तारमळा, थेऊर.

सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षक शाळा- तारमळा,थेऊर  

               धन्यवाद !

गणेश जयंती ---आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम

  गणेश जयंती ---आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम  

             माघ शुद्ध चतुर्थी --- श्री गणेश जयंती. थेऊर हे अष्टविनायकांपैकी गणेशाचे एक ठिकाण. चिंतामणी गणपतीची कृपा थेऊर गावावर आहे. या थेऊर गावातच तारमळा ही शाळा असल्याने आमचीही गणेशावर श्रद्धा आहे आणि गणेशाची आमच्यावर कृपा आहे. 
            माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी शाळेत गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणेश --- बाल गणेशाचा जन्मदिन मुलांनी स्वतःच्या वाढदिवसापेक्षाही आंनदाने साजरा केला. या प्रसंगी शाळेने मुलांना खाऊ वाटप केले.
                 बालगणेशाच्या जन्म सोहळ्याची काही क्षणचित्रे