सोमवार, १३ मार्च, २०१७

रंगांचा सण - होळी

होळी आणि धुलीवंदन  

                  ऑनलाइन परीक्षा देत डिजिटल शाळेची वाटचाल करत असताना परंपरा जपण्याचा प्रयत्न आमची शाळा करत असते. त्यामुळेच शाळेत सर्वच सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात.

             होळी -- वाईट प्रवृतींवर चांगल्या प्रवृतींच्या विजयाचा संदेश देणारा हा सण. वाईट गोष्टींना नष्ट करण्याचा मानस मनात ठेऊन आम्ही कचऱ्याची होळी करण्याचे नियोजन केले. या उपक्रमाची तयारी म्हणून सर्व मुलांनी परिसरातील कागद आणि कचरा गोळा केला. होळीच्या दिवशी संध्याकाळी या सर्व कचऱ्याची शाळेच्या आवारात होळी करण्यात आली. तत्पूर्वी शाळेतील शिक्षकांनी मुलांना होळी सणाविषयी गोष्ट सांगितली.

         होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा. या दिवशी मुलं शाळेत विविध रंग घेऊन हजर होती. अतिशय आनंदात आणि उत्साहात मुलांनी शाळेत रंगांची उधळण एकमेकांवर केली आणि सगळी शाळा काही क्षणात रंगीबेरंगी झाली.  रंगात माखलेली मुले  पाहून जणू काही बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत आहेत असा भास होत होता. 

                               पाहू या काही क्षणचित्रे  

















 

ऑनलाईन परीक्षा दिनांक १९/०२/२०१७

ऑनलाईन परीक्षा दिनांक १९/०२/२०१७  

                  सिंधुगुरू टीम ,सिंधुदुर्ग येथील शिक्षकांनी इयत्ता चौथी /पाचवी आणि सातवी /आठवी या दोन गटांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर एस.टी.एस. ऑनलाईन परीक्षेचे नियोजन केले होते.
                 महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातील बारा विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाली होते. आनंद आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे सर्व विद्यार्थी आपल्या तारमळा शाळेचे होते.
                या परिक्षेत सहभागी होण्यासाठी मुलांचे मेल आय डी तयार करणे आवश्यक होते. ते मुलांनी तयार केले. परिक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरले आणि दिनांक १९/०२/२०१७ रविवार रोजी सर्व बारा मुलांनी यशस्वीरित्या ही परीक्षा दिली.