शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

आमचा अभिमान - आमचे संविधान

आमचा अभिमान - आमचे संविधान 

               आज २६ नोव्हेंबर . संविधान दिन. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, असा आजचा दिवस . आपल्या संविधानाविषयी  मुलांना माहिती मिळावी या हेतूने  आजचा दिवस  जिल्हा  परिषद प्राथमिक  शाळा  तारमळा  येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रसंगी  प्रभात फेरी काढण्यात आली.

           त्याचबरोबर याच दिवसाचे औचित्य साधून तंबाखू मुक्त  हवेली  प्रकल्पांतर्गत  मुलांना  तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. 

         शाळेत परत आल्यावर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले गेले. 

                                        क्षणचित्रे 






 

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

एक उपक्रम - समाजापर्यंत पोचण्यासाठी

 एक उपक्रम - समाजापर्यंत पोचण्यासाठी 

        शाळेच्या  सर्वांगीण विकासासाठी शाळेमधील समाजाचा सहभाग  हा अतिशय महत्त्वाचा  ठरतो. मग तो भौतिक सुविधांबाबत असेल अगर  उपक्रमांमधील कृतियुक्त सहभाग असेल.

          हा दृष्टीकोन  नजरेसमोर ठेऊन  आम्ही समाजापर्यंत पोचण्यासाठी  आम्ही आणखी एका संपर्क साधनाचा वापर करण्याचे नियोजन केले असून आता आम्ही फेसबुकच्या माध्यामतून आपणासमोर येत  आहोत. 

         फेसबुकवर  आम्ही आपल्या मैत्रीची प्रतीक्षा करत आहोत.

                         चला भेटू फेसबुकवर .........

वाटचाल - नवपर्वाकडे

वाटचाल - नवपर्वाकडे 

             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा, आपल्या विविध उपक्रमांमुळे उपक्रमशील शाळा म्हणून परिसरात ओळखली जाते. 

             शाळेच्या उपक्रमांबरोबरच शाळेच्या   भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी शाळा प्रयत्नशील होती. या प्रयत्नांना यश आले. जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामपंचायत थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन अद्ययावत इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष मान. श्री. प्रदीपदादा कंद यांच्या हस्ते दिनांक २१/०८/२०१६ रोजी झाले.

                                             भूमिपूजन




                
                        सुमारे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दिनांक १८/११/२०१६ वार शुक्रवार रोजी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.
                                    बांधकाम सुरुवात





मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

आमची शाळा --- आमची बातमी

आमची शाळा --- आमची बातमी 

           सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळादेखील कात टाकू लागल्या आहेत. तालुका,जिल्हयातील अनेक शाळा डिजिटल शाळेच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
         आम्हीदेखील या प्रवाहामध्ये आमची भूमिका साकारू पाहतोय. याचाच एक भाग म्हणून शाळेचा ' सुसंवाद - तारमळा शाळा ' नावाचा  'Whatsapp' ग्रुप आहे. शाळेतील सर्व घडामोडी या ग्रुपवर शेअर केल्या जातात. व्यवस्थापन समितीची विविध निमंत्रणे देखील याच माध्यमातून पाठविली जातात.
           दैनिक केसरी व दैनिक प्रभात या वर्तमानपत्रांचे आपल्या भागाचे बातमीदार शाळेच्या विविध कार्यक्रमांबाबत वेळोवेळी बातम्या प्रसिध्द करतात. त्यांच्या सहकार्याने शाळेचे उपक्रम प्रसिध्दी माध्यमांपर्यंत पोहचले आहेत. 
             वर्तमानपत्रात आलेल्या शाळेविषयीच्या काही बातम्या 
                            दैनिक पुढारी दिनांक १६/०६/२०१६, वार - गुरुवार
 दैनिक केसरी दिनांक २८/०८/२०१६, वार - रविवार
                    दैनिक प्रभात दिनांक १५/११/२०१६, वार - मंगळवार

                      दैनिक प्रभात  १८/१०/२०१६, वार - मंगळवार

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

बालदिन -- बाल आनंद मेळावा

बालदिन -- बाल आनंद मेळावा 

                आज दिनांक १४/११/२०१६ वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
         बालदिनानिमित्त शाळेत आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा निसर्ग रम्य अशा रामदरा देवालय लोणी काळभोर या ठिकाणी आयोजित केला होता. वनविहार, वनभोजन, विविध खेळ, गाणी, गोष्टी, झाडावर चढण्याचा आनंद असे वेगवेगळे आनंददायी उपक्रम या वेळी राबविले गेले.
       माता पालक संघाने या कार्यक्रमात उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. मुलांना खाऊसाठी लाडू, गुलाबजाम, चकली, चिवडा असे पदार्थ देण्यात आले. इतर अनेक कार्यक्रमाप्रमाणेच बालदिनाचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी ठरला. 
                     आमचा आंनद 
















शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

दीपोत्सव

दीपोत्सव 
             सालाबादप्रमाणे या वर्षाचा दीपोत्सव दिनांक १०/११/२०१६ वार गुरुवार रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तारमळा  येथील सर्व ग्रामस्थ, पालक , विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 
           आजच्या दिवसाचा सुवर्णयोग साधत आम्ही आज आमच्या शाळेच्या  ब्लाॅगचे  उद्घाटन  केले.  दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघालेली शाळा ......












बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

आमची सहल ----- आगळीवेगळी नव्हे, अगदी वेगळी

आमची सहल ----- आगळीवेगळी नव्हे, अगदी वेगळी 

        सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा अभ्यास दौरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी या ठिकाणी आयोजित केला होता. या दरम्यान झालेल्या चर्चेत शाळा व्यव-
-स्थापन समिती अध्यक्षांनी पालक विद्यार्थी एकत्रित सहलीबाबत सूचना मांडली आणि सर्वांनी या सूचनेला मान्यताही दिली.
         यातूनच शाळेने सर्वानुमते शिक्षक, पालक, व विद्यार्थी अशा सर्वांची सहल गणपतीपुळे व कोल्हापूर  येथे आयोजित केली.
         गणपतीपुळे येथील निळाशार, अथांग समुद्र पाहिल्यावर मनाबरोबरच पायांनीही समुद्राकडे धाव घेतली. सागराच्या प्रत्येक लाटेबरोबर मुलांच्या व पालकांच्या आनंदाला आलेले उधाण पाहून डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. आमच्या नकळत हे अश्रू समुद्राच्या पाण्यात मिसळून गेले. थेऊर केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. स्नेहलता शितोळे या प्रसंगाच्या साक्षीदार होत्या. हा आनंद, हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवावा........ वर्णन करणे केवळ अशक्य.
                मालगुंड परिसरातील निसर्गरम्य वातावरणात संध्याकाळ घालवून आम्ही कोल्हापूर येथे मुक्काम केला. 
           दुसऱ्या दिवशीचे कोल्हापूर दर्शन अप्रतिम झाले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात महालक्ष्मी देवीचे दर्शन करून शाहू पॅलेस पाहिले. हा ऐतिहासिक वारसा पाहताना सर्वजण भान हरपून गेले.
           त्यांनतरचा टप्पा होता तो म्हणजे कणेरी मठ. ग्रामसंस्कृतीची ओळख सांगणारा. या ठिकाणच्या आरसे महालात बालचमू हरवून गेले. कणेरी मठातील प्रत्येक पुतळा कलाकाराच्या कलात्मकतेची साक्ष देत होता. प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवायलाच हवा असा हा संस्कृतीचा आरसा. सुमारे तीन तास फिरून संध्याकाळी ज्योतिबाला वंदन करून सर्वजण घरी परतले.
         शाळेतील केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या परस्पर सहकार्य व एकजुटीमुळे सहल यशस्वी झाली. 

                            क्षणचित्रे